बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
F
30-01-2025
कुरखेडा : तालूक्यातीलशिरपूर येथील ओमप्रकाश तूळशीराम सहारे यांच्या शेतशिवारातून विद्युत पंप चोरणाऱ्या आरोपींना कुरखेडा पोलिसांनी जेरबंद केले आहे. विलास सहारे (४१) रा. शिरपूर, विनोद पोवळे (३५) रा.भगवानपूर अशी आरोपींची नावे आहेत.
गावातीलच एका इसमाने सदर पंप पळवून नेत नजीकच्या गावातील एका इसमाच्या मदतीने विकण्याचा तयारीत असल्याची कूणकूण पोलीस व गावकऱ्यांना लागली होती. ही बाब लक्षात घेत पोलिसांच्या मार्गदर्शनात शिरपूरचे पोलीस पाटील विश्वनाथ रामटेके यानी पंप विकत घेण्याची बतावणी केली व आरोपी सोबत खोटा ग्राहक बनून चर्चा सूरू केली. नजीकच्या भगवानपूर या गावात दडवून ठेवण्यात आलेला पंप विकण्याचा उद्देशाने शनिवार रोजी गावी एका शेतात आणताच शेतातच दडून असलेले गावकरी व फीर्यादीने धाव घेत दोन्ही आरोपींना चोरीच्या मोटारपंपा सहीत रंगेहाथ पकडले व पोलिसांना सुचना केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून प्रकरणाचा पूढील तपास ठाणेदार महेन्द्र वाघ यांच्या मार्गदर्शनात साहायक पोलीस उपनिरीक्षक कूसन हलामी करीत आहेत.
Your car is our responsibility
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments