STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
F
30-01-2025
आरमोरी, (ता.प्र). 1 एप्रिल 1993 पासून गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी करण्यात आली. मात्र ही दारूबंदी कायद्याने जरी बंद असली तरी लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातून अवैधरित्या दारू आणून तसेच शेतशिवारात, जंगलात मोहफुलाची दारू काढून काही लोकांमार्फत दारूचा व्यवसाय सुरू आहे. दारु विक्रेत्यांच्या मुजोरीने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. या विरोधात आता स्थानिक जनता रस्त्यावर उतरली असून सोमवारी (दि.27) रात्री 9 वाजताच्या सुमारास आरमोरी येथील टिळक चौकातील नागरिकांनी दुर्गा मंदिर चौकात एकत्र येऊन दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून 'आक्रोश'
आस्मा केला शहरात दारू विक्रेत्यांची वाढलेली भाईगिरी हे आता नागरिकांच्या डोक्याच्या पार झाली आहे. त्याचा रोष आता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. मुख्यतः दारू विक्रेत्यांची बोलीभाषा व अरेरावी ही आता स्थानिकांसाठी मोठी अडचण होत आहे. त्यातच तरूण मोठ्या प्रमाणात दारुच्याआहारी गेल्याने आता पालकांमध्येही रोष व्यक्त होत आहे. आरमोरी शहरातील दारू विक्रेत्यांवर पोलिस प्रशासनाने कडककारवाई करून शहरातील दारू विक्रेत्यांचा अवैध व्यवसाय संपुष्टात आणावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
माहिती द्या, तत्काळ कारवाई : ठाणेदार गवते
आरमोरी येथील टिळक चौकात जनता दारू व्यवसायिकांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याने राकाँचे कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी पोलिस निरीक्षक कैलास गवते यांना बोलावले. आरमोरी शहरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांना संपुष्टात आणण्यासाठी आम्हाला आपल्या मदतीची गरज आहे. आपल्या वॉर्डात विक्रेते दारू विक्री करत असताना आम्हाला फोन करा, आम्ही ताबडतोब येऊन त्या विक्रेत्याविरोधात कठोर कारवाई करू, असे आश्वासन पोनि गवते यांनी दिले. त्यासाठी त्यांनी आपला व आपल्या कर्मचाऱ्यांचा मोबाइल नंबर देऊन दारू विक्रेत्यांची माहिती द्या, असे आवाहन केले.
दारुसह इतरही अवैध व्यवसायावर कारवाई करा
आरमोरी शहरातील टिळक चौक, दुर्गा मंदिर परिसरात एकत्र आलेल्या नागरिकांनी पोलिस निरीक्षक कैलास गवते यांना आरमोरी शहरात सुरू असलेल्या दारू व्यवसायासोबतच सर्रास सुरू असलेली सट्टापट्टी, सुगंधी तंबाखूचा व्यवसाय सुद्धा बंद करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. शहरात अवैध व्यवसायांना उत आला आहे. याची दखल ठाणेदार गवते यांनी घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments