CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
F
01-01-2025
Happy New Year Messages In Marathi : प्रत्येक वर्ष येतं आणि निघून जातं. आपण येणाऱ्या वर्षाकडून खूप अपेक्षा ठेवतो, जे काही हवं आहे ते मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करतो. येणाऱ्या वर्षाचे स्वागत तुम्ही जल्लोषात करत असाल. धमाल, मस्ती, मनोरंजनाला उधाण आली असेल, पण त्याचबरोबर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठीही तुम्ही उत्सूक असाल. नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तजन सगळ्यांना नवीन वर्षाच्या खास शुभेच्छा द्यायच्या असतील, चला तर मग, करूया सुरुवात….सर्वांच्या मनात सर्वांसाठी असावं प्रेम, येणारा प्रत्येक दिवस आणो आनंदाचा क्षण, नव्या उमेदीसोबत सगळं दुःख विसरून करा नव्या वर्षाला वेलकम!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
1. प्रत्येक आनंद प्रत्येक पावलावर तुला मिळो,
जगातील प्रत्येक यश तुझ्याकडे येवो,
या नव्या वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
2. नववर्षाची सकाळ होताच तुमचं आयुष्यही व्हावं प्रकाशमय ही प्रार्थना करू,
नववर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप चांगलं जावो या हार्दिक शुभेच्छा
3.नवीन वर्षातील नवीन सकाळ,
नवीन संध्याकाळ, नवीन वर्षातील नवीन स्वप्नं,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
3 जुनं वर्ष होत आहे सगळ्यांपासून दूर,
यश आणि आनंद सगळ्यांना मिळो भरपूर,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
4 .माझी इच्छा आहे की येणारे 12 महिने सुख मिळो,
52 आठवडे यश आणि 365 दिवस मजेदार जावोत माझ्या मित्र-मैत्रिणींना,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
5 . सूर्यासारखी प्रकाशमान होवो तुझं आयुष्य चांदण्यासारखं चमकावं तुझं नशीब,
माझ्या शुभेच्छा तुझ्यापाठी कायम असतील,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
6. येणारं हे नववर्ष तुम्हा सगळ्यांना चांगले जावो,
ईश्वराची कृपा तुमच्यावर राहो.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नवीन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा
1. नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयं, नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं, नवी नाती, नवं यश, नवा आनंद. कधी अपूर्ण, कधी संपूर्ण, नवा हर्ष, नवं वर्ष…!
नवीन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा
2. सरले ते वर्ष, गेला तो काळ, नवी सुरूवात, नवा आनंद घेऊन आलं 2025 साल, नवीन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा
3. जे गेलं ते वर्ष विसरून जा, नव्या वर्षाला आपलंस करा, देवाकडे करतो हीच प्रार्थना या नव्या वर्षात होवो सर्व स्वप्नांची पूर्ती तुमच्या नवीन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा
4. नववर्ष तुमच्या जीवनातील दुखाःचा नाश करू दे नव्या सुखांना तुमच्या आयुष्यात आणू दे नवीन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा कुटुंबासाठी
1. कुटुंब हे सर्वात मोठं गिफ्ट आहे जे सगळ्यांना मिळालं आहे. हे नवं वर्ष तुमच्यासाठी कुटुंबासोबत अजून चांगल्या आठवणी देणारं जावं. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
2.नवं वर्ष येवो घेऊन येवो सुखाचा प्रकाश,नशिबाची दारं उघडावी,देव राहो तुमच्यावर प्रसन्न,
हीच प्रार्थना आहे देवाकडे तुमच्या चाहत्याची, नववर्षाभिनंदन।।
3. तुम्ही जिथे जाल तिथे करा फ्लाय ऑल टियर, सर्व लोकांचे व्हा तुम्ही डिअर,
तुमचा मार्ग राहो ऑलवेज क्लियर आणि देव तुम्हाला देवो झक्कास न्यू ईयर. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
4. मी खूप लकी आहे की, मला चांगली आणि प्रेमळ फॅमिली मिळाली.त्यांच्या चेहऱ्यावर सदैव असंच हसू कायम राहो,2025 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
5. तुझ्यासारखी आई असणं ही देवाचीच कृपा आहे. मला देवाचे खूप खूप आभार मानायचे आहेत.
तुझा आशिर्वाद या नव्या वर्षातही माझ्यासोबत कायम राहो आई. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
6. हॅपी न्यू ईयर टू आईबाबा, माझ्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी ऋणी आहे. तुम्हाला दोघांनाही खूप खूप प्रेम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
मित्र-मैत्रिणी, आप्तजनांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
1.नववर्ष तुमच्या जीवनातील दुखाःचा नाश करू दे आणि नव्या सुखांना तुमच्या आयुष्यात आणू दे. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
2.आशा आहे तुम्हाला नव्यावर्षात प्रत्येक दिवशी यश मिळो, प्रत्येक दिवस आनंदी असो. हॅपी न्यू ईयर.
3. मित्रांनो, उद्या करायचं ते आज करा आणि आज करायचं ते आत्ता.
मग उद्याऐवजी आजच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
3. नववर्ष तुमच्यावर करो नव्या संधीची बरसात, प्रत्येक पावलावर तुम्हाला मिळो यश आणि आनंद साजरा करण्याचं कारण, हॅपी न्यू ईयर.
4. नवे वर्ष येवो घेऊन यशाचा प्रकाश, उघडू दे नशीबाचा दरवाजा, हीच आहे प्रार्थना तुमच्या आमच्या कुटुंबासाठी. नवीन वर्षाच्या शुभेच्छा
5. आम्ही राहतो तुमच्या मनात, दुसरं कोणी शुभेच्छा देवो ना देवो आमच्याकडून सर्वात आधी हॅपी न्यू ईयर 2025 च्या तुम्हाला शुभेच्छा अपरंपार
6. या वर्षाच्या सूर्याचा अस्त होण्यापूर्वी आणि जुनं कॅलेंडर भिंतीवरून काढण्यापूर्वी,दुसऱ्या कोणी तुम्हाला विश करण्यापूर्वी मी तुम्हाला देत शुभेच्छा. तुमच्यासाठी येणारं 2025 वर्ष जावो जबरदस्त, नववर्षाभिनंदन.
Redefine your style
book your appointment now
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments