रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
F
30-12-2024
Majhi Ladki Bahin Yojana: 2024 या वर्षात महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत, त्यातील सर्वाधिक गाजलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेमुळे महिलांना आर्थिक आधार मिळाला आहे.
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 ची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत या योजनेचे 6 हफ्ते पूर्ण झाले असून, जवळपास प्रत्येक पात्र महिलेला ₹9000 त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.
अनेक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला नव्हता किंवा काहींनी उशिरा अर्ज भरला होता. अशा महिलांसाठी आता पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारने योजनेत काही सुधारणा करण्याचा विचार केला असून, पुढील आर्थिक वर्षात योजनेतील मासिक रक्कम ₹2100 करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी त्यांच्या आधार कार्डला बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. याआधी जवळपास 12 लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नव्हते, त्यामुळे त्यांना लाभ मिळण्यात अडथळे आले. डिसेंबर 2024 पर्यंत अशा महिलांनी त्यांचे आधार लिंकिंग पूर्ण केल्यानंतर त्यांना ₹9000 मिळाले आहेत.
सरकारकडून लवकरच नव्या अर्ज प्रक्रियेची घोषणा होण्याची शक्यता आहे. परंतु, अर्ज प्रक्रिया सुरू होण्यासाठी काही महिने वाट पाहावी लागू शकते. ज्या महिलांनी अजूनही अर्ज केलेला नाही, त्यांनी आपले आधार कार्ड आणि बँक खाते अपडेट ठेवावे, जेणेकरून लाभ घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हा
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments