STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
15-07-2024
सावली Chandrapur :- चंद्रपूर - गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरवरील हिरापुर गावाजवळ रस्त्याच्या मध्यभागी धोकादायक स्थितीत उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव दुचाकीची धडक बसल्याने दुचाकी वरील ४ वर्षीय बालक व १ इसम जागीच ठार झाले. तर २ जण गंभीर जखमी झाले.
ही घटना शनिवारी सायंकाळी हिरापूर गावाजवळ घडली. या घटनेमध्ये वरुण हरिदास बोरूले वय वर्ष ४ , उमेश श्रीरंग गुरनुले वय वर्ष २७ दोघेही रा. फराळा, ता चार्मोशी जि. गडचिरोली यांचा मृत्यू झालेला आहे.
तर शेवंता रामदास कावळे वय वर्ष ६५ रा नवेगाव, हरीदास बापुजी बोरुले वय वर्ष ४० रा. फराळा, ता. चार्मोशी असे जखमी झालेल्या चे नाव आहे.
उमेश गुरनुले हा दुचाकी क्रमांक एमएच ३३ एइ. १८३७ या गाडीने शेवंता, वरुण, हरीदास यांना घेऊन फराळा येथे जात असताना दरम्यान हिरापूर बसस्थानका जवळ धोकादायक स्थितीत रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेला ट्रक क्रमांक C. G. 08 AX 6171 ला जोरदार धडक दिली.
या धडकेत वरून व उमेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर शेवंता आणि हरिदास हे गंभीररीत्या जखमी झाले. अपघात झाल्याचे कळताच ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळा वरून फरार झाला. याबदल माहिती मिळताच सावली पोलिसांना घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
तसेच फरार ट्रकचालकाला पकडण्यासाठी शोधमोहीम राबवली. दरम्यान ट्रकचालकावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायद्यान्वये १०६ (०१), १२५ (ए), १२५ (बी), २८५ सहकलम १२२, १३४ ए, १३४ (ब) वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन ट्रकचालकाला ट्रकसह खेडी फाट्याजवळ अटक केली.
जखमींवर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही कारवाई सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सचिन मुसळे, पोलिस हवालदार विनोद नीखाडे, स्वप्निल दुर्योधन, अशोक मडावी, संजय शुक्ला यांच्या पथकाने केली.
अधिक वाचा :- Today Horoscope :- १५ जुलै २०२४ ; एखादी हरवलेली वस्तू अचानक सापडेल
अधिक वाचा :- Warora News :- वरोरा पोलीस ठाण्यातील शिपायाने केले विष प्राशन
अधिक वाचा :- Today Horoscope :- १४ जुलै २०२४ ; विश्वासार्हता वाढेल, व्यवसायात लाभ, शुभ दिवस आहे
अधिक वाचा :- Warora News :- वरोरा शहरात चोरीचे सत्र सुरूच, लखोचे सोने चांदी आणि रोख रक्कम केली लंपास
अधिक वाचा :- Chandrapur News :- चंद्रपूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी निलंबित ! नोटीस येताच कार्यवाही
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा Chandrapur
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments